»मंडळाची विशेषता (Board Specialities)–
- शासन निर्णय क्र.व्हिओसी-2012/591/प्र.क्र.245(अ)/व्यशि-4, उच्च व तंत्रशिक्षण विभाग दिनांक 28 सप्टेंबर-2012 अन्वये मंडळाचे दोन वर्ष कालावधीच्या पुर्ण वेळ स्वरूपाच्या विविध गटातील अभ्यासक्रमांना + 2 स्तराची समकक्षता (Equivalance) उच्च शिक्षणासाठी म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
- मंडळाचे 1 वर्ष व 2 वर्ष कालावधीच्या पूर्णवेळ स्वरूपाचे विविध गटातील अभ्यासक्रमांना औद्योगीक प्रशिक्षण संस्थांमधील अभ्यासक्रमाशी (शासन निर्णयामध्ये दर्शविल्यानुसार) नोकरीसाठी पर्यायी शैक्षणिक अर्हता (Alternate Qualification) म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
- मंडळाचे इयत्ता 10 वी प्रवेश शैक्षणिक अर्हता असलेल्या 2 वर्ष कालावधीचे अभ्यासक्रमांना “पदविका अभ्यासक्रम” (Diploma Course) अशा नावाने प्रमाणपत्र प्रदान करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
- मंडळाचे संगणक गटातील (Computer Group) संगणका विषयी असलेल्या अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्रधारक कर्मचारी हे शासकीय सेवेसाठी आवश्यक असलेली संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण असल्याचे समजण्यात येईल.
- सार्वजनिक बांधकाम विभागातील “स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक” या पाठयक्रमाशी मंडळातील (i) वास्तूशास्त्र आरेखक (आर्किटेक्चरल ड्राफ्टसमन) व (ii) कनस्ट्रक्शन सुपरवायझर हे दोन अभ्यासक्रम समकक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
- जिल्हा परिषदेमधील कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर नामनिर्देशनाने नियुक्ती करण्यासाठी मंडळाचा कस्ट्रक्शन सुपरवायझर हा अभ्यासक्रम समकक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
- मंडळाचा “बॉयलर अटेंडंन्ट ” ( Boiler Attendant ) हा अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेनंतर स्टिम बॉयलरवरील फायरमन किंवा ऑपरेटर किंवा असिस्टंट फायरमन किंवा असिस्टंट ऑपरेटर म्हणून 1 वर्ष कालावधीचा अनुभव धारण केले नंतर बाष्पके संचालनालयाकडील ( Directorate of Boiler) व्दितीय बॉयलर परिचर (Equivalent of second class Boiler Attendant Certificate of competency) समकक्षतेसाठीच्या पृष्ठांकनासाठी (Endorsement) पात्र झालेला आहे.
- मंडळातील काही अभ्यासक्रमांच्या परीक्षेसाठी थेट बसण्याची (डायरेक्ट ऍ़डमिशन टु एक्झामिनेशन) संधी उपलब्ध आहे.
- भारत सरकार द्वारा निर्गमित शासन निर्णय, भारत राजपत्र असाधारण भाग क्ष्क्ष् खण्ड 3 – उप खण्ड (1) प्रधिकार द्वारा प्रकाशित अधिसूचना रजिस्ट्री क्र. जी. एल. 33004/99 दिनांक 7 सप्टेंबर, 2017 कोशल्य विकास व उद्योजकता विभाग, नवी दिल्ली., अन्वये महाराष्ट राज्य कौशल्य विकासपरीक्षा मंडळाच्या अभ्यासक्रमांना ॲप्रेन्टिसेस अधिनियम 1961लागू करण्यात आलेली आहे.
- मंडळाच्या दोन वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमांना तंत्रशिक्षण परीक्षा मंडळाच्या पदविका अभ्यासक्रमांना थेट द्वितीय वर्षांस प्रवेश देण्यात येतो.
- मंडळाच्या इलेक्ट्रिशियन/वायरमन/लाईनमन या अभ्यासक्रमांना महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी मर्यादित (महावितरण) यांच्या भरती प्रक्रियेमध्ये तसेच शिकाऊ उमेदवारी प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
- मंडळाच्या परावैद्यक (पॅरामेडीकल) अभ्यासक्रमांना महाराष्ट्र राज्य पॅरामेडीकल कौन्सिलमार्फत परावैद्यक व्यवसायी व्यक्तींनी नोंदणी देण्याबाबत महाराष्ट्र राज्य परावैद्यक परिषद, मुंबई यांची सकारात्मक प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
- मंडळाच्या ॲक्युपंक्चर/ ॲक्युप्रेशर विषयक अभ्यसक्रमांना महाराष्ट्र राज्य ॲक्युपंक्चर परिषद, मुंबई यांचेकडून ॲक्युपंक्चर/ ॲक्युप्रेशर व्यवसायी व्यक्तींनी नोंदणी देण्याबाबत महाराष्ट्र राज्य ॲक्युपंक्चर कौन्सिल, मुंबई यांची सकारात्मक प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
- मंडळाच्या इमारत देखभाल व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हे अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवारांना कंत्राटदार म्हणून वर्ग -7 मध्ये नोंदणी देण्यात येते.
- मंडळाच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेशित विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासात 66.67% सवलत देण्यात आली आहे.