महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ, वांद्रे (पूर्व), मुंबई 400 051.
नागरीकांची सनद
प्रस्तावना :-
पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेणे पदविका आणि प्रमाणपत्रे देणे इत्यादीकरीता शा.नि.क्र.इएक्सएम 7380/173896/(6106)/टीई-1, दि.23-3-1981 अन्वये तंत्र शिक्षण परीक्षा मंडळ स्थापन करण्यांत आले होते. शासनाने तंत्र शिक्षण संचालनालयाचे “तंत्रशिक्षण संचालनालय” आणि “व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय” असे विभाजन केल्यामुळे तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या परीक्षांसाठी एक आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या परीक्षा घेण्यासाठी दुसरे अशी दोन परीक्षा मंडळे शिक्षण व सेवायोजन विभाग शा.नि.क्र.इएक्सएम7384/38751/(535)/तांशि-1(अ), दि.23 जानेवारी 1986 अन्वये स्थापन करण्यांत आले.
मंडळाचे उद्दिष्ट :-
औद्योगिकरणातील वाढ, बदलते तंत्रज्ञान, सामाजिक व आर्थिक बदल या बाबींचा विचार करता कौशल्य विकास होणेचे दृष्टीने व्यावसायिक अभ्यासक्रम तयार करुन अशा विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारास चालना (Employablility) मिळणेचे दृष्टीने आवश्यक असणा-या व्यवसाय शिक्षणाची गरज भागविण्यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखाली सन 1986 पासून महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परीक्षा मंडळाची स्थापना करण्यांत आली आहे.
कार्य :-
- अभ्यासक्रम व पाठयपुस्तके ठरविणे.
- मंडळाने ठरविलेले अभ्यासक्रम शिकविणेसाठी इच्छुक शैक्षणिक संस्थांना मान्यता देणे.
- शिक्षकांची किमान शैक्षणिक अर्हता ठरविणे. / प्रश्नपत्रिका तयार करुन घेणे.
- परीक्षा घेणे.
- निकाल जाहीर करुन गुणपत्रक व प्रमाणपत्र वाटप करणे.
- मान्यताप्राप्त संस्थांचे निरीक्षण करणे.
रचना :-
मंडळाने मान्यता दिलेल्या राज्यभरातील विविध शैक्षणिक संस्थेतून गांव, तालुका, जिल्हा स्तरावर 6 महिने, 1 वर्ष,
2 वर्ष कालावधीचे अर्धवेळ, पुर्णवेळ असे एकंदरीत 279 अभ्यासक्रम राबविले जातात. अशा विविध अभ्यासक्रमांच्या धोरणात्मक बाबी मंडळ कार्यालयामार्फत धोरणात्मक निर्णय घेतले जातात. गांव, तालुका, जिल्हा स्तरावर जे विविध अभ्यासक्रम राबविले जातात त्यांचे पर्यवेक्षक व सनियंत्रण करणेसाठी प्रादेशिक कार्यालयाचे स्तरावर सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण यांची कार्यालये आहेत. जिल्हा स्तरावर या योजनांचे पर्यवेक्षण व सनियंत्रण करणेसाठी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांची कार्यालये आहेत. संस्था स्तरावर अभ्यासक्रमांची अमंलबजावणी व पर्यवेक्षण संबंधीत संस्थाप्रमुख करीत असतात.
कार्यपुर्तीचे वेळापत्रक:-
म.रा.कौशल्य विकास शिक्षण परीक्षा मंडळामार्फत राबविण्यांत येणा-या योजनांचे सेवाचे कार्यपूर्तीचे वेळापत्रक परिशिष्ट 02 मध्ये सादर करण्यात आलेले आहे.
नियम / शासन निर्णय :-
मंडळाचे विविध योजनांचे संबंधीत नियम व विविध फॉर्मस् मंडळ कार्यालयाचे msbsde.edu.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यांत आलेले आहेत. तसेच मंडळाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यांत येत असलेल्या नियम, सुचना, वेळापत्रक, मान्यता आदेश, परिपत्रके इत्यादी बाबतची माहिती वरील संकेत स्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यांत येते.
गा-हाणी / तक्रारी यांचे निराकरण :-
कार्यपूर्तीस होणारा विलंब वा अन्य काही गा-हाणी असल्यास त्यासंबंधीचे परिशिष्ट – 02 मध्ये नमूद केलेल्या अधिका-यांकडे तक्रारी नोंदविता येतील.
जनसामान्यांकडून सूचना :-
नागरिकांची सनद सर्वसामान्य नागरिकांच्या छाननीसाठी नेहमीच खुली असेल व सन्माननीय नागरिकांच्या बहुमुल्य सुचनांचा गांभिर्यपुर्वक विचार करुन त्यात वेळोवेळी सुधारणा घडवून आणता येतील. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेले कौशल्य विकास परीक्षा मंडळाच्या अधिनस्त सेवा उपभोगणा-या नागरिकांना आपले हक्क मांडण्यासाठी सनद नेहमी सहकार्य करील.
नागरिकांच्या सनदेची अमंलबजावणी :-
म.रा.कौशल्य विकास परीक्षा मंडळ सनदेची अमंलबजावणी करणेसाठी कटीबध्द आहे. मंडळाच्या अधिनस्त असलेल्या सेवा कर्तव्यभावनेने व कार्यतत्परतेने उपलब्ध करुन देण्याची हमी देत आहे. या सेवा पुरविताना नागरिकांना सौजन्यपुर्वक वागणूक देण्याची जबाबदारी विभागातील प्रत्येक अधिकारी / कर्मचारी यांची राहील.
अध्यक्ष
म. रा. कौशल्य विकास परीक्षा मंडळ,
वांद्रे (पूर्व), मुंबई 400 051.
परिशिष्ट – 02
कार्यपूर्तीचे वेळापत्रक
कार्यासन क्रमांक | विभागाकडून / कार्यालयाकडून पुरविण्यांत येणारी सेवा | आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर किती कालावधीत सेवा पुरविली जाते | सेवा पुरविणारा अधिकारी / कर्मचारी कार्यासन क्र. व दुरध्वनी / | सेवा विहित कालावधीत पुरविली न गेल्यास ज्यांचेकडे तक्रार करता येईल तो अधिकारी कक्ष क्रमांक दुरध्वनी / विस्तारीत क्रमांक |
1 | 2 | 3 | 4 | 5 |
कार्यासन क्र.01
मान्यता |
खाजगी / शासकीय / निमशासकीय संस्थेतील शिकविण्यांत येणा-या विविध मान्यताप्राप्त अभ्यासक्रम चालविणा-या संस्थांना मान्यता देणे / विद्यमान संस्थेत नविन अभ्यासक्रम / जादा तुकडी सुरु करणे, नूतनीकरण मान्यता प्रदान करणे, कायमस्वरुपी मान्यता प्रदान करणे, इत्यादी करीता इच्छुक संस्थांनी विहीत नमुन्यातील परिपूर्ण भरलेला अर्ज संबंधीत जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालयाकडे सादर करणे. जिल्हा कार्यालयाने निरिक्षण झाल्यानंतर सहसंचालक, प्रा. कार्यालयाकडे सादर करणे. सहसंचालक, प्रादेशिक कार्यालयाकडून शिफारस झाल्यानंतर मंडळ कार्यालयाच्या छाननी नंतर ठरवून दिलेल्या मानकानुसार संलग्नता प्राप्त करुन घेणे. | महाराष्ट्र शासकीय कर्मचा-यांचे बदल्यांचे विनियमन, शासकीय कर्तव्ये पार पाडण्यासाठी होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मधील प्रकरण क्र.3 च्या कलम 10 (1) मधील तरतूदीस अनुसरुन तात्काळ नस्ती शक्यतो त्याच दिवशी किंवा दुस-या दिवशी आणि तातडीच्या स्वरुपाची नस्ती 4 दिवसात निकाल काढण्यात येईल अन्य विभागाशी संबंधित नसलेल्या नस्तींवर 45 दिवसांचे आंत व दुस-या विभागाशी बाब अंतर्भूत असलेल्या नस्तीवर 3 महिन्यांच्या आंत निर्णय घेऊन कार्यवाही करण्यांत येईल. यासाठी मंडळ कार्यालयाकडून योजना राबविण्यासाठी सविस्तर वेळापत्रक तयार करण्यांत येऊन ते वेळोवेळी मंडळाच्या संकेत स्थळावर प्रकाशित केले जाते. विहित केलेल्या मान्यता प्रक्रिया कार्यक्रम वेळापत्रकानुसार. | सचिव, परीक्षानियंत्रक, संबंधीत लिपिक दुरध्वनी क्र.
26474435 सहसंचालक, प्रा.का. तसेच संबंधीत जिल्हयाचे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, संस्थांचे प्राचार्य / संस्थाचालक |
दुरध्वनी क्र.
26474435 |
परीक्षा विभाग
कार्यासन क्र.4, 6/7, 8/9, 10/11 व 15 |
महाराष्ट्र राज्यामध्ये कौशल्य विकास परीक्षा मंडळाकडून 6 महिने, 1 वर्ष व 2 वर्ष अर्धवेळ व पूर्णवेळ कालावधीचे संगणक गट, पॅरामेडीकल गट, इलेक्ट्रीक गट, मेकॅनिकल गट अशा विविध सेक्टरमधील 29 गटातील अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात येते व सदर अभ्यासक्रम राज्यातील विविध मान्यताप्राप्त संस्थांकडून राबविले जातात. यासाठी प्रवेशाचे वेळापत्रक निश्चित करण्यांत येते. अशा अभ्यासक्रमांची परीक्षा मंडळ कार्यालयामार्फत माहे जानेवारी, एप्रिल, जून / जुलै मध्ये घेतली जाते. परीक्षा झालेनंतर विद्यार्थ्यांचे निकालपत्रक, गुणपत्रक व प्रमाणपत्र वितरीत करण्यांत येते. | महाराष्ट्र शासकीय कर्मचा-यांचे बदल्यांचे विनियमन, शासकीय कर्तव्ये पार पाडण्यासाठी होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मधील प्रकरण क्र.3 च्या कलम 10 (1) मधील तरतूदीस अनुसरुन तात्काळ नस्ती शक्यतो त्याच दिवशी किंवा दुस-या दिवशी आणि तातडीच्या स्वरुपाची नस्ती 4 दिवसात निकाली काढण्यात येईल अन्य विभागाशी संबंधित नसलेल्या नस्तींवर 45 दिवसांचे आंत व दुस-या विभागाशी बाब अंतर्भूत असलेल्या नस्तीवर 3 महिन्यांच्या आंत निर्णय घेऊन कार्यवाही करण्यांत येईल. यासाठी मंडळ कार्यालयाकडून योजना राबविण्यासाठी सविस्तर वेळापत्रक तयार करण्यांत येऊन ते वेळोवेळी मंडळाच्या संकेत स्थळावर प्रकाशित केले जाते. | सचिव,परीक्षानियंत्रकउपसचिव, अधिक्षक, कॉम्प्युटर प्रोग्रामर संबंधित लिपिक दुरध्वनी क्र.
26474435
तसेच संबंधीत जिल्हयाचे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, संस्थांचे प्राचार्य / संस्थाचालक |
दुरध्वनी क्र.
26474435 |
शैक्षणिक विभाग
कार्यासन क्र.12 |
विद्यमान परीस्थितीनुसार नवनविन अभ्यासक्रम तयार करणे, परीक्षा पध्दती, अभ्यासक्रम पध्दतीमध्ये सुधारणा करणे, अभ्यासगट अद्ययावत करणे, मागणीनुसार नविन अभ्यासक्रमांचा शोध घेणे व तयार करणे. | महाराष्ट्र शासकीय
कर्मचा-यांचे बदल्यांचे विनियमन, शासकीय कर्तव्ये पार पाडण्यासाठी होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मधील प्रकरण क्र.3 च्या कलम 10 (1) मधील तरतूदीस अनुसरुन तात्काळ नस्ती शक्यतो त्याच दिवशी किंवा दुस-या दिवशी आणि तातडीच्या स्वरुपाची नस्ती 4 दिवसात निकाली काढण्यात येईल अन्य विभागाशी संबंधित नसलेल्या नस्तींवर 45 दिवसांचे आंत व दुस-या विभागाशी बाब अंतर्भूत असलेल्या नस्तीवर 3 महिन्यांच्या आंत निर्णय घेऊन कार्यवाही करण्यांत येईल. यासाठी मंडळ कार्यालयाकडून योजना राबविण्यासाठी सविस्तर वेळापत्रक तयार करण्यांत येऊन ते वेळोवेळी मंडळाच्या संकेत स्थळावर प्रकाशित केले जाते. |
सचिव,परीक्षानियंत्रक भांडारपाल
दुरध्वनी क्र. 26474435
तसेच संबंधीत जिल्हयाचे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, संस्थांचे प्राचार्य / संस्थाचालक |
दुरध्वनी क्र.
26474435 |
अध्यक्ष
म. रा. कौशल्य विकास परीक्षा मंडळ,
वांद्रे (पूर्व), मुंबई 400 051.