मुख्य उद्दिष्ट्ये

»मुख्य उद्दिष्ट्ये (Core Values) –

   1. मंडळाकडे सोपविलेल्या निरनिराळया प्रमाणपत्र परीक्षा व व्यवसाय परीक्षा यासाठी अभ्यासक्रम ठरविणे व त्यानुसार परीक्षा घेणे.
   2. परीक्षा घ्यावयाच्या अभ्यासक्रमांचा विचार करण्यासाठी अभ्यासमंडळे नेमणे (जास्तीत जास्त 10) (या अभ्यास मंडळांवर संबंधित विषयातील तज्ञांची नियुक्ती मंडळाच्या वतीने चेअरमन, महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांच्याकडून करण्यात यावी.) तसेच अभ्यास मंडळांनी केलेल्या शिफारशींचा विचार करण्यासाठी एक विद्वत परिषद नेमणे. ( या परिषदेवर प्रत्येक अभ्यास मंडळाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळाच्या सदस्यांपैकी सहा सदस्य असावेत.)
   3. अभ्यासक्रमांसाठी पाठयपुस्तके / संदर्भ पुस्तके ठरविणे व आवश्यक तेथे दृकश्राव्य साधने सुचविणे.
   4. अभ्यासक्रमासाठी लागणारी साधने व उपकरणे यांची यादी करुन त्यासाठी आवश्यक आर्थिक भार निश्चित करणेअभ्यासक्रम शिकविण्यासाठी नेमावयाच्या शिक्षकांसाठी शैक्षणिक पात्रता, कार्यभार व अनुभव ठरविणे.
   5. अभ्यासक्रम शिकविण्यासाठी नेमावयाच्या शिक्षकांसाठी शैक्षणिक पात्रता, कार्यभार व अनुभव ठरविणे.
   6. परीक्षा घेण्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करणे.
   7. परीक्षेचे निकाल जाहीर करुन अंतिम परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने प्रमाणपत्र प्रदान करणे.
   8. परीक्षेतील विद्यार्थ्यांचे गैरप्रकार, विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका, प्रात्यक्षिके व टर्मवर्क तपासतांना परिक्षकांकडून होणारे गैरप्रकार याबाबत चौकशी करणे, दोषी ठरणा-यास शिक्षा सुचविणे व या सर्व कामासाठी समित्या / खास समित्या नेमणे.
   9. मंडळाने ठरविलेले अभ्यासक्रम शिकवण्यिासाठी शैक्षणिक संस्थांना मान्यता देणे.
   10. मंडळाने ठरविलेलेल्या अभ्यासक्रमांच्या आधारे निरनिराळया परीक्षांचा समान दर्जा ठरविण्याच्या दृष्टीने संचालक, तंत्र शिक्षण यांना आवश्यक तेव्हा सल्ला देणे.
   11. महाराष्ट्र राज्य शासनाने वेळोवेळी सोपविलेली या व अशा प्रकारची इतर कामे पार पाडणे.