मंडळाची विशेषता

»मंडळाची विशेषता (Board Specialities)–

 1. शासन निर्णय क्र.व्हिओसी-2012/591/प्र.क्र.245(अ)/व्यशि-4, उच्च व तंत्रशिक्षण विभाग दिनांक 28 सप्टेंबर-2012 अन्वये मंडळाचे दोन वर्ष कालावधीच्या पुर्ण वेळ स्वरूपाच्या विविध गटातील अभ्यासक्रमांना + 2 स्तराची समकक्षता (Equivalance) उच्च शिक्षणासाठी म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
 2. मंडळाचे 1 वर्ष व 2 वर्ष कालावधीच्या पूर्णवेळ स्वरूपाचे विविध गटातील अभ्यासक्रमांना औद्योगीक प्रशिक्षण संस्थांमधील अभ्यासक्रमाशी (शासन निर्णयामध्ये दर्शविल्यानुसार) नोकरीसाठी पर्यायी शैक्षणिक अर्हता (Alternate Qualification) म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
 3. मंडळाचे इयत्ता 10 वी प्रवेश शैक्षणिक अर्हता असलेल्या 2 वर्ष कालावधीचे अभ्यासक्रमांना “पदविका अभ्यासक्रम” (Diploma Course) अशा नावाने प्रमाणपत्र प्रदान करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
 4. मंडळाचे संगणक गटातील (Computer Group) संगणका विषयी असलेल्या अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्रधारक कर्मचारी हे शासकीय सेवेसाठी आवश्यक असलेली संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण असल्याचे समजण्यात येईल.
 5. सार्वजनिक बांधकाम विभागातील “स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक” या पाठयक्रमाशी मंडळातील (i) वास्तूशास्त्र आरेखक (आर्किटेक्चरल ड्राफ्टसमन) व (ii) कनस्ट्रक्शन सुपरवायझर हे दोन अभ्यासक्रम समकक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
 6. जिल्हा परिषदेमधील कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर नामनिर्देशनाने नियुक्ती करण्यासाठी मंडळाचा कस्ट्रक्शन सुपरवायझर हा अभ्यासक्रम समकक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
 7. मंडळाचा “बॉयलर अटेंडंन्ट ” ( Boiler Attendant ) हा अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेनंतर स्टिम बॉयलरवरील फायरमन किंवा ऑपरेटर किंवा असिस्टंट फायरमन किंवा असिस्टंट ऑपरेटर म्हणून 1 वर्ष कालावधीचा अनुभव धारण केले नंतर बाष्पके संचालनालयाकडील ( Directorate of Boiler) व्दितीय बॉयलर परिचर (Equivalent of second class Boiler Attendant Certificate of competency) समकक्षतेसाठीच्या पृष्ठांकनासाठी (Endorsement) पात्र झालेला आहे.
 8. मंडळातील काही अभ्यासक्रमांच्या परीक्षेसाठी थेट बसण्याची (डायरेक्ट ऍ़डमिशन टु एक्झामिनेशन) संधी उपलब्ध आहे.
 9. भारत सरकार द्वारा निर्गमित शासन निर्णय, भारत राजपत्र असाधारण भाग क्ष्क्ष् खण्ड 3 – उप खण्ड (1) प्रधिकार द्वारा प्रकाशित अधिसूचना रजिस्ट्री क्र. जी. एल. 33004/99 दिनांक 7 सप्टेंबर, 2017 कोशल्य विकास व उद्योजकता विभाग, नवी दिल्ली., अन्वये महाराष्ट राज्य कौशल्य विकासपरीक्षा मंडळाच्या अभ्यासक्रमांना ॲप्रेन्टिसेस अधिनियम 1961लागू करण्यात आलेली आहे.
 10. मंडळाच्या दोन वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमांना तंत्रशिक्षण परीक्षा मंडळाच्या पदविका अभ्यासक्रमांना थेट द्वितीय वर्षांस प्रवेश देण्यात येतो.
 11. मंडळाच्या इलेक्ट्रिशियन/वायरमन/लाईनमन या अभ्यासक्रमांना महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी मर्यादित (महावितरण) यांच्या भरती प्रक्रियेमध्ये तसेच शिकाऊ उमेदवारी प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
 12. मंडळाच्या परावैद्यक (पॅरामेडीकल) अभ्यासक्रमांना महाराष्ट्र राज्य पॅरामेडीकल कौन्सिलमार्फत परावैद्यक व्यवसायी व्यक्तींनी नोंदणी देण्याबाबत महाराष्ट्र राज्य परावैद्यक परिषद, मुंबई यांची सकारात्मक प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
 13. मंडळाच्या ॲक्युपंक्चर/ ॲक्युप्रेशर विषयक अभ्यसक्रमांना महाराष्ट्र राज्य ॲक्युपंक्चर परिषद, मुंबई यांचेकडून ॲक्युपंक्चर/ ॲक्युप्रेशर व्यवसायी व्यक्तींनी नोंदणी देण्याबाबत महाराष्ट्र राज्य ॲक्युपंक्चर कौन्सिल, मुंबई यांची सकारात्मक प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
 14. मंडळाच्या इमारत देखभाल व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हे अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवारांना कंत्राटदार म्हणून वर्ग -7 मध्ये नोंदणी देण्यात येते.
 15. मंडळाच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेशित विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासात 66.67% सवलत देण्यात आली आहे.